दिनांक २२ जून २०२४, श्रीगोंदा:
काष्टी येथील आरपिआयचे नेते आणि नागवडे साखर कारखान्याचे संचालक बंडू नामदेव जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संमतीने अहमदनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, दत्तात्रय पानसरे, आदेश नागवडे, तालुकाध्यक्ष सुभाष शिंदे, तालुका युवक अध्यक्ष विक्रम पाचपुते यांसह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
बहुजन सामाजिक चळवळीत अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या जगताप यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निमित्ताने अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. उपस्थित नेत्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार, जगताप हे नक्कीच आपल्या पदाला न्याय देतील आणि सामाजिक न्यायासाठी महत्वपूर्ण योगदान देतील.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



