श्रीगोंद्यात अनधिकृत साग लाकूड वाहतूक प्रकरणी वन विभागाची दंडात्मक कारवाई..

दिनांक ८ जून २०२४ श्रीगोंदा:

शहरात अनधिकृत साग लाकूड वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर वन विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने अनधिकृत साग लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक संतोष खेतमाळीस आणि ट्रॅक्टर मालक विठ्ठल खेतमाळीस यांना प्रत्येकी १००० रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच, झाड परवाना नसताना तोडले आणि वाहतूक केली म्हणून, झाड मालक अमोल मुळे यांना ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

सदर कारवाई वनपाल श्रीगोंदा विजया मोरे यांनी गणेश मिसाळ, सहाय्यक वन संरक्षक अधिकारी यांच्या आदेशाने केली आहे. कारवाईनंतर ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला होता, मात्र नंतर तो वरिष्ठांच्या सूचनेनुसार सोडण्यात आला असल्याची माहिती वनपाल पोतकुले यांनी माध्यमांना दिली आहे. वन विभागाच्या या कठोर कारवाईमुळे अनधिकृत लाकूड वाहतूक करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

स्रोत:(वनपाल पोतकुले)

जाहिरात..
जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading