१४ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू..

दिनांक ९ जून २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरालगत असलेल्या घुगल वडगाव येथे १४ वर्षीय मुलगा विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना दिनांक ८ जून २०२४ रोजी घडली.

घटनेची सविस्तर माहिती अशी की, मोतीराम केशव शिंदे (वय १४) राहणार घुगल वडगाव, हा आपल्या शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेला असताना विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. त्यानंतर दिगंबर मच्छिंद्र शिंदे यांनी त्याला ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचारासाठी आणले, परंतु डॉक्टरांनी तपासून मोतीरामला मृत घोषित केले.

दिगंबर शिंदे यांच्या खबर दिल्यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संग्राम जाधव करीत आहेत.

स्रोत:(आकस्मित मृत्यू नोंद)

जाहिरात..
जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading