दिनांक १० सप्टेंबर, श्रीगोंदा:
शहरातील सिद्धार्थ नगर व ससाणे नगर मधील नागरिकांना स्थानिक आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे की, उद्या दिनांक 11 सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी ठीक 9:00 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

वय वर्षे 18 पुढील सर्व स्थानिक रहिवासी (गर्भवती महिला, स्तनदा माता, कॅन्सर पीडित, दुर्धर आजार पीडितांसह) नागरिकांनी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी उपस्थित राहावे. अशी माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे. सोबत येतांना मोबाईल (ओटीपीसाठी) व आधारकार्ड (ओळखीसाठी) आणावेत. असेही सांगण्यात आलेले आहे.
सिद्धार्थ नगर व ससाणे नगर मधील ज्या नागरिकांनी अजूनही लस घेतलेली नाही. अशांनीच सकाळी ठीक 9:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये शिस्तीचे पालन करून, उपस्थित राहावे. संपूर्ण परिसरातील नागरिकांना लसीच्या उपलब्धते नुसार लसीकरण करण्यात येणार असल्याचे डॉक्टर नितीन खामकर यांनी सांगितले आहे.

या लसीकरण कॅम्पबाबत अधिक माहितीसाठी दत्ताजी जगताप: (9422235707), संदीप मोटे,सर: (9850674001), अमर घोडके: (9657612196), अविनाश घोडके: (9503032300), संदीप उमाप: (9527396666), विशाल घोडके: (9767824907), नंदू ससाणे: (9975533154), पप्पू घोडके: (8805665933), श्रीकांत घोडके: (9665558036), गोरख घोडके: (9970201188) यांच्याशी संपर्क साधावा..
स्रोत:(आरोग्य विभाग,श्रीगोंदा)..
