A.I.J.Q.A. कमेटीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी आतिक कुरेशी यांची नियुक्ती..

दिनांक ९ सप्टेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील अल्पसंख्यांक, वंचित, उपेक्षित, मागासवर्गीय समाज घटकांसाठी सदैव सक्रिय असलेले युवा कार्यकर्ते आतिक भाई कुरेशी यांची “ऑल इंडिया जमियतुल कुरेश एक्शन कमिटी”च्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक इसाक कुरेशी यांनी नुकतेच त्यांना सुपूर्द केले आहे.

कोरोना साथ संक्रमण काळामध्ये आतिक भाई कुरेशी यांनी दुर्लक्षित आणि उपेक्षित लोकांसाठी मोठे योगदान दिले आहे. गरजूंना धान्य, जीवनावश्‍यक किट, किराणा सामान, औषध, ॲम्बुलन्सच्या माध्यमांतून अत्यवस्थ असलेल्या कोरोना रुग्णांना स्वतः दवाखान्यापर्यंत उपचारासाठी पोहोचवले आहे.

या माध्यमांतून त्यांनी समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषता ते सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटत असल्याने, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ए.आय.जे.क्यू.ए.सी. या सामाजिक संघटनेने आतिक भाई कुरेशी यांना अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

आतिक भाई गुलाम हुसेन कुरेशी यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात संघटनेने नमूद केले आहे की, ऑल इंडिया जमियतुल एक्शन कमिटी संपूर्ण ताकदीनिशी सामाजिक कार्यासाठी बरोबर आहे. संघटनेचे पदाधिकारी वाढवून, संघटना मजबूत करण्यासाठी आतिक भाई यांना पुढील तीन वर्षासाठी अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नेमण्यात येत आहे. तसेच, काम करतांना संघटनेच्या कायदे संहितेत सर्वसामान्यांचे कामं मार्गी लावुन, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. निवडीबद्दल संघटनेचे पदाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक इसाक कुरेशी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आतिक भाई कुरेशी यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समाजातील तसेच, मागासवर्गीय बौद्ध बांधवांसह मित्रपरिवाराने शुभेच्छा व्यक्त करत त्यांना सदिच्छा दिल्या आहेत.

स्रोत:(नियुक्ती पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading