#श्रीगोंदा..ससाणेनगर दगडफेक प्रकरण: दलित हिंदू कुटुंबांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा, मंत्री नितेश राणे यादिवशी उपस्थित राहणार..

दिनांक २८ जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

दिवाळी पाडव्या दिवशी ससाणेनगर येथील हिंदू वस्तीवर कट्टरपंथी जिहादी समाजाकडून दगडफेक झाल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात अनेक दलित हिंदू कुटुंबांना मानसिक व आर्थिक फटका बसला असून, या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकल हिंदू समाजातर्फे मोठ्या प्रमाणात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य मोर्चाची रूपरेषा:

  • दिनांक:
  • बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५
  • वेळ:
  • दुपारी १२:०० वाजता
  • स्थळ:
  • क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले चौक ते साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे स्मारक, ससाणेनगर वस्ती, श्रीगोंदा शहर

या मोर्चात महाराष्ट्रातील आक्रमक नेते व मंत्री नितेशजी राणे स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह बहुसंख्य हिंदू बांधव या आंदोलनात सहभागी होणार असून, पीडित दलित हिंदू कुटुंबांना न्याय देण्यासाठी एकजूट दाखवली जाणार आहे.

सकल हिंदू समाजाने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोर्चादरम्यान सरकार आणि प्रशासनाला दलित कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी ठराव मांडण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

सकल हिंदू समाजाच्या वतीने या मोर्चात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading