श्रीगोंद्यातील पत्रकार व त्यांच्या पत्रकारितेचे वास्तव…

श्रीगोंदा तालुक्यात अनेक वृत्तपत्र येतात.यात देश,राज्य , जिल्हा व स्थानिक पातळीवर प्रकशित होणारे दैनिक, साप्ताहिक , नियतकालिक , मासिकं,त्रैमासिकं,पाक्षिकं सह सांजदैनिकं,मिळेल तेंव्हा आपले विचार स्पष्ट व कुवतीनुसार मांडणारे वृत्तपत्र याठिकाणी आहेत.तेवढेंच त्यांचे प्रतिनिधी, पत्रकार,शहर प्रतिनिधी,तालुका प्रतिनिधी,बरोबरीने वार्ता(बातमी)हरन करणारे वार्ताहर हि आहेत.

श्रीगोंद्यात वर नमूद सर्वच प्रकारचे वृत्तपत्रे येतात. ज्यात त्यात्या वृत्तपत्राचे वाचक आहेत.सर्वात जास्त वाचक असणारा वृत्तपत्राचे प्रतिनिधी ग्रुप मध्ये काम करायचे . त्यांनी कमिशन वाईज ठेवलेलं खट्याळ पोर जे प्रत्येक अपडेट वर नजर ठेऊन असायचे.ते काही दिवसांपासून एकमेकांपासून दुरावलेले जाणवतात.श्रीगोंद्यात कार्यरत असणाऱ्या काही पत्रकारांना अजून,पत्रकारितेची व्यख्या त्यांची कर्तव्य आणि कार्य यांची पुरेपूर जाणीव नाही.असे निदर्शनास येत आहे. एखाद्या वृत्तपत्राने त्याला पत्रकार म्हणून घोषित केले कि,तो आजन्म पत्रकार होतो.त्याला बातमी कशाला म्हणतात? बातमी कशी लिहायची? हेही माहिती नसते.म्हणून काही पत्रकार शासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये,आमदार, खासदार यांचे कार्यालये,आदि ठिकाणी ग्रुप करूनच जातात.
श्रीगोंद्यात वृत्तपत्राच्या टी.आर.पी.नुसार प्रतिनिधींचा तोरा ठरतो.या ठिकाणी चार पत्रकार संघ आहेत.प्रत्येक जण भिन्न प्रवाहातून काम करीत आहे.प्रत्येक ठिकाणी वर्गवारीच होते.मोठे वृत्तपत्र,त्यापेक्षा मध्यम,त्याहून छोटे आणि मंग एकदमच साधे.त्यानुसार कार्यालयात व पत्रकार परिषद मध्ये सुरवातीच्या खुर्च्या टी.आर.पी.नुसारच ताब्यात घेतल्या जातात.पत्रकार परिषदेचे निमंत्रण मिळाल्यावर,निमंत्रण देणाऱ्याला पत्रकार परिषदेचा विषय न विचारता नाश्ता काय आहे? हे विचारणारे काही पञकार येथे आहेत.एखाद्या उपेक्षितांची बातमी छापायची असल्यास त्याच्याकडून पैसे घेणारे हि काही आहेत.पत्रकार परिषदेत पुढाऱ्यांच्या पोरांच्या पायाला हात लावणारे काही आहेत.समोरच्याला प्रश्न विचारण्या ऐवजी टिंगल टवाळी करणारे हि काही आहेत.दादांची बातमी करणारे आहेत.ताईंची बातमी हायलाईट करणारे आहेत,अण्णांची बातमी प्रकर्षाने प्रसारित करणारे आहेत,त्याच बरोबर सामाजिक भान जपणारे हि पत्रकार आहेत.दादा,ताई,आण्णा,काका,मामा या प्रत्येकाच्या मतप्रवाहशी समरस असणारे हि आहेत.पुढारी किंवा राजकारण्यांनी एकमेकांवर टीका टिप्पन्नी केली.किंवा आरोप प्रत्यारोप केले.तर,स्वतः पुढाऱ्यांच्या शाबासकीसाठी किंवा जाहिरातीसाठी बातम्या छापणारे येथे उपलब्ध आहेत. पुरोगामी चळवळीचा टेम्भा मिरवणारे हि आहेत आणि चळवळीशी प्रामाणिक असणारेही आहेत.पत्रकारितेची पदवी घेतलेले आहेत.तर,एकदम न शिकलेले पण आहेत. रोज अंकात दहा-दहा बातम्या छापणारे आहेत.तर,एकही बातमी न छापता पत्रकार म्हणून मिरवणारे हि आहेत. आज अंकात काय-काय छापायचे? याची पंचायत असणारे हि आहेत.तर,दुसरीकडे बातमी लिहता येत नाही म्हणून,दुसऱ्या पत्रकारांच्या मागे फिरणारे हि लाचार काही आहेत.
दलित,आदिवासी,भटकेविमुक्त,कष्टकरी,शेतकरी,अत्याचारित,पीडित उपेक्षित,गरीब, निराधार,व्यवस्थेचा बळी ठरलेल्यांसाठी आपले जीवन अर्पण करणारेही आहेत.मात्र, निव्वळ पत्रकारितेचा अर्थ हि न समजनारे कमी नाहीत. श्रीगोंद्यातील काही पत्रकारांची पत्रकारिता हि मान-पानासाठी हरपलेली आहे. दुसऱ्या पत्रकाराला नीच लेखणे व त्यातून स्वतःची प्रतिष्ठा सिद्ध करण्यात काही मंडळी धन्यता मानत आहे.आज कोणत्याही शुल्लक विषयाची बातमी होत आहे.नेत्यांच्या म्हशीला तीन पिल्लं झाली तरी बातमी होत असुन,आमच्या पिचलेल्या व खचलेल्या आई बहिणीवर चार चार नराधम अत्याचार करतात.त्याची बातमी उशिराने होत आहे.व्यवस्थावाद्यांनी पेहराव बदलला,चप्पल बदलली तरी बातमी होते.राजकीय उद्देशाने काम करणाऱ्यांची ही बातमी होते.मात्र,उपेक्षितांची दखल घेतल्याचे ज्ञात नाही.दलितावर अन्याय,अत्याचार झाला.तर,काहींनी आरोपींची बाजू घेतल्याचे नवीन नाही.याचे अनेक उदाहरणं देता येतील.सामाजिक व चळवळीच्या घटना श्यक्यतो प्रकाशित केल्या जात नाहीत.अधिकाऱ्यांशी मैत्री करण्यासाठी त्यांच्या वतीने विषय हाताळल्याचे नवीन नाही. शासकीय कार्यालय हे काही पत्रकारांसाठी उत्पन्नाचे स्रोत आहेत.याठिकाणी दर सोमवारी आर्थिक हितसबंध जोपासण्याचे काम काही अधिकारी करीत आहेत.अश्या या पत्रकारितेतील काही भयाण वास्तवतेच्या घटना नमूद कराव्याश्या वाटल्या.कारण……..असो मी ही एक पत्रकारच आहे….

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading