शेडगाव येथे कृषी दिन संपन्न, मृद आरोग्य पत्रिकाचे शेतकऱ्यांना वितरण…
शेडगाव,श्रीगोंदा,दिनांक १जून
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येतो,या दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांच्यावतीने,शेडगाव येथे आज कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के किसनराव सांगळे ,संदीप बोदगे ,(सरपंच )विजयराव शेंडे ,(माजी सरपंच)भिमराव बेलेकर प्रगतशील शेतकरी सुरेश रसाळ व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप बोदगे यांनी केले.कार्यक्रमात उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान विषयी(मंडळ कृषी अधिकारी)किसनराव सांगळे यांनी मार्गदर्शन केले.तसेच,कृषी विभागाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी याविषयी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी मार्गदर्शन केले.
तालुका(कृषी अधिकारी)कार्यालयाकडून शेडगाव मधील शेतकऱ्यांचे माती नमुने तपासून त्या मृदाआरोग्य पत्रिकेचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले..दिवसें दिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने,पूर्वीचा बागायत ऊस पट्टा असलेला शेडगाव आता फळपीक लागवडीकडे वळू लागला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ पिकांची लागवड करून एकत्रित गट शेती करावी व कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे .अशी अपेक्षा सरपंच विजयराव शेंडे यांनी व्यक्त केली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदुतांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (कृषिदूत)अंकुश खोसे यांनी केले. तर,उपस्थितांचे आभार (कृषिदुत)योगिराज गायकवाड यांनी मानले..