काष्टी येथे गैरव्यवहार प्रकरणी “श्री.स्वामी समर्थ पतसंस्थे”वर कारवाईची मागणी..
फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश असतांना, विलंब होत असल्याचा,राजेंद्र पाचपुतेंचा आरोप..

दिनांक १ नोव्हेंबर,(काष्टी)श्रीगोंदा:
काष्टी येथील राजेंद्र माणिकराव पाचपुते यांनी श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काष्टी च्याविरुद्ध गेली अनेक वर्षापासून संस्थेतील गैरप्रकार व सामान्यांच्या होत असलेल्या फसवणुकी बाबत पाठपुरावा करीत,श्री स्वामी समर्थ पतसंस्था व त्यातील संचालक मंडळावर कायदेशीर कारवाईची मागणी करीत आहेत.
या प्रकरणाचा पाठपुरावा करत असतांना,संस्थेचे कलम ८८, ७९, ८९ अंतर्गत “सहाय्यक निबंधक अधिकारी श्रीगोंदा”यांनी राजेंद्र पाचपुते यांच्या अर्जावरून श्री.स्वामी समर्थ पतसंस्थेची चौकशी केली.यावरून,नमूद संस्थेत कशाप्रकारे गैरव्यवहार होतात,हे सिद्ध झाले आहे.दिनांक ३१ मे २०१९ रोजी या संस्थेची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी यांना संस्थेच्या गैरव्यवहारा बाबत कारवाईचे आदेश दिले असतांना,योग्य वेळेत चौकशी अधिकारी एस.डी.कुलकर्णी यांनी संगनमताने सदर संस्थेला कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी वेळ मिळऊन दिला.जेणे करून संस्थेस ३१ मे २०१९ च्या आदेशा -वर स्टे मिळवन्यास संधी प्राप्त झाल्याचे,पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे.
राजेंद्र पाचपुते यांनी या संस्थेवर आदेशानुसार कारवाई होत नसल्याने,माननीय औरंगाबाद कोर्टात राइट पिटीशन दाखल केले होते.त्यावर, माननीय औरंगाबाद कोर्टाने दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत सदर प्रकरणाची चौकशी करून,कारवाईचे निर्देश दिले.त्यानुसार,दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ रोजी “सहाय्यक निबंधक अधिकारी” श्रीगोंदा यांनी,चौकशी अधिकारी एस.डी.कुलकर्णी यांना संबंधित संस्था-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.मात्र,त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत राजेंद्र पाचपुते यांनी विचारणा केली असता, चौकशी अधिकारी कुलकर्णी यांनी इलेक्शन ड्युटी,दिवाळीची सुट्टी असल्याचे उडवाउडवीची उत्तरे दिली.आज तक्रारी आदेशाला २० ते २५ दिवस उलटून गेलेले असतानाही,संबंधितांवर कुठलीही कारवाई केलेली नाही.
याचा अर्थ संबंधित सर्व अधिकारी या संस्थेला एका प्रकारे मदत करत आहेत.म्हणून या प्रकरणातील सर्वच दोषी अधिकारी यांचीही कायदेशीर चौकशी व्हावी.तसेच त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी.याविषयीचे प्रसिद्धी पत्र राजेंद्र पाचपुते यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे.
आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी श्री.स्वामी समर्थ पतसंस्थेतील अफरातफर व गैरकारभारास जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे पत्र श्रीगोंदा पोलिस स्टेशनला देण्यासाठी, चौकशी अधिकारी एस.डी.कुलकर्णी(विशेष लेखा -परीक्षक,वर्ग २ सहकारी संस्था,अहमदनगर) आले होते .मात्र,नमूद प्रकरणातील तपासी अधिकारी श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे दिवाळी सुट्टीवर असल्याने,ते आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतील. पोलीस निरीक्षक जाधव यांना नमूद प्रकरण कळवण्यात आले असून,तशी स्टेशन डायरीत नोंद करण्यात आली असल्याची माहिती(पोलीस उपनिरीक्षक)पाटील यांनी चौकशी अधिकारी कुलकर्णी यांना यावेळी सांगितल्या चे समजते आहे.
श्री.स्वामी समर्थ पतसंस्था मर्या.काष्टी संस्थेतील अफरातफर व गैरकारभारा बाबत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याने,(पोलिस निरीक्षक)जाधव कामावर रूजू झाल्यावर,नमूद इसमांवर गुन्हे दाखल होणार.हे मात्र निश्चित झालेले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading