अपरात्री एस.टी.तून निर्जनस्थळी उतरविल्यावर,कॉलेज तरुणीवर श्वानाचा हल्ला..

कंडक्टर डी.एच.लोंढेला निलंबित करण्यासाठी श्रीगोंदा बस स्थानकात आंदोलन..

दिनांक २ नोव्हेंबर श्रीगोंदा(फॅक्टरी)श्रीगोंदा:
श्रीगोंदा फॅक्टरी येथील श्रद्धा घनवट ही विद्यार्थिनी पुणे येथे शिक्षण घेत आहे.दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी पुणे – श्रीगोंदा ही बस संध्याकाळी श्रीगोंदा फॅक्टरी वरील घनवट वस्ती या बस थांब्यावर थांबते.म्हणून नमूद बसने प्रवास करीत,श्रद्धा घरी जाण्यासाठी निघाली.प्रवासा दरम्यान घनवट वस्ती येथील बस थांब्यावर येई पर्यंत रात्र झाली.या बसचा वाहक डी.एच.लोंढे यास श्रद्धाने घनवट वस्ती बस थांब्यावर गाडी थांबण्यास सांगितली.मात्र,बेजबाबदार लोंढे वाहकाने बस नमूद थांब्यावर न थांबवता एक किलोमीटर पुढे नेली व रेल्वे फाटक लिंपणगाव येथील निर्जनस्थळी थांबवली.एस.टी.तूनू श्रद्धास उतरवून दिले.अंधारात उतरल्यानंतर श्रद्धावर मोकाट श्वानाने हमला केला.त्यात ती जखमी झाली आहे. तिला थांब्यावर नेण्यास आलेला तिचा भाऊ श्रद्धाच्या किंचाळ्या ऐकुन रेल्वे स्टेशनच्या गेटच्या दिशेने धावत गेला व तिची सुटका केली. ही दुर्घटना श्रद्धाच्या जीवावर बेतली असती.म्हणून,लोंढे वाहकास निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या सर्व प्रकरणात जिम्मेदार वाहक लोंढे यास निलंबित करा.अन्यथा,दिनांक ४ नोव्हेंबर २०१९ रोजी श्रीगोंदा एस.टी.आगाराचे गेट बंद करीत आंदोलन करणार असल्याचा इशारा(शेतकरी संघटनेचे अध्यक्ष) अनिल घनवट यांनी एस.टी.प्रशासनास दिला आहे. याचे निवेदन राज्य परिवहन महामंडळ,पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांनाही देण्यात आले आहे.
अशाप्रकारे सामान्य प्रवाशांना वागणूक देणाऱ्या एस.टी.प्रशासनाच्या मग्रूर कर्मचारी व अधिकाऱ्यांचा निषेध याठिकाणी करण्यात येणार आहे.त्याचबरोबर यापूर्वी काही पीडीतांबरोबर अशाप्रकारे घटना घडल्या आहेत.त्यांनीही अनिल धनवट यांच्याशी (९९२३७०७६४६) या क्रमांकावर संपर्क साधत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन घनवट यांनी प्रसिद्धि पत्राद्वारे केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading