पोलिस चौकीसाठी बोरुडेंचे आमरण उपोषण..

दिनांक ४ नोव्हेंबर(मांडवगण)श्रीगोंदा:
मांडवगण येथे कायमस्वरुपी पोलीस चौकी व्हावी. या प्रलंबित मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश नाना बोरुडे यांनी आमरण उपोषण करनार असल्याचे निवेदन जिल्हा प्रशासनास दिले आहे.

मांडवगण हे मोठे गाव असून,येथे राजरोस वेगवेगळ्या प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे.शाळा,काॅलेज मधील मुलींनी रोड रोमिओंच्या छेडछाडीस कंटाळून शिक्षण सोडून दिले आहे. गावात विविध अवैध धंद्याचे स्तोम माजले आहे.

यासाठी येथे कायम स्वरुपी पोलीस चौकी असणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.याबाबत अनेक वेळा मागणी करुनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. गावातील पदाधिकारी हा विषय गांभीर्याने घेत नाहीत. म्हणून,येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश नाना बोरुडे हे शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर पासुन,श्रीगोंदा पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार आहेत.याविषयी त्यांनी मा. जिल्हाधिकारी, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मा.तहसिलदार श्रीगोंदा यांना निवेदन दिले आहे.
जिल्हा प्रशासनास बोरुडे यांनी दिलेले निवेदन..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading