भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या ८ बोटी नष्ट..
श्रीगोंदा तहसीलदारांची कारवाई..

दिनांक ७ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
दिनांक ६ नोव्हेंबर रोजी अजनुज,आर्वी,पेडगाव या परिसरात भीमा नदीच्या पत्रातून बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार,(तहसीलदार,श्रीगोंदा)महेंद्र माळी यांच्या पथकाने नमूद ठिकाणी कारवाई करीत,स्फोटकाच्या सहाय्याने एकूण ८ बोटी नष्ट केल्या आहेत.ज्यां मुद्देमालाची अंदाजे ४० लक्ष रुपये किंमत आहे.
या पथकात आजबे,(पेडगाव मंडळ अधिकारी),प्रशांत सोनवणे(मंडळ अधिकारी),सतीश घोडेकर (लिपि क),दादा टाके(पोलिस कॉन्स्टेबल),उत्तम राऊत,(पोलीस कॉन्स्टेबल) प्रताप देवकाते (पोलीस कॉन्स्टेबल)किरण बोराडे(पोलीस कॉन्स्टेबल)हे सर्व कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
भविष्यात श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रात चालू असलेल्या वाळू उपसावर अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती,श्रीगोंदयाचे तहसीलदार महेंद्र माळी(महाजन)यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
