दिनांक 17.06.2026 रोजी सकाळी 11.00 वाजणेच्या सुमारास फिर्यादीचे राहते घरासमोर झोपडपट्टी काष्टी येथे फिर्यादीस तू झोपडपट्टीतील लोकांना आमचे विरोधात फितवत आहे, तुझा काटाच काढतो, असे म्हणून अंगावर पेट्रोलच्या बाटलीतील पेट्रोल ओतून माचीसची काडी अंगावर फेकून पेटून देऊन पळून गेले म्हणून फिर्यादी नामे रेणुका बांगर भोसले राहणार झोपडपट्टी काष्टी तालुका श्रीगोंदा यांचे फिर्यादी वरुन *श्रीगोंदा पो.स्टे.गु.र.नं. 618/2026 BNS 109,127(2),189(2),190,191(3),351(2) प्रमाणे* गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील 1. सुप्रिया शेंड्या काळे, वय 30 वर्ष 2. छम्मा शेंड्या काळे वय 35 वर्ष दोन्ही रा. झोपडपट्टी काष्टी, ता.श्रीगोंदा या 2 आरोपींना अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे सो तसेच मा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी.मनोहर खिळदकर, पो.उप.निरी.भगवान गांगर्डे, पोहेकाॅ.संभाजी वाबळे, मपोहेकाॅ.जमुना बजंगे, मपोकाॅ.राणी व्यवहारे यांनी केली आहे.
