बेलवंडीतील वृद्धाची एक लाखाची फसवणूक.

दिनांक १३ फेब्रुवारी,बेलवंडी,श्रीगोंदा:
बँकेमधून बोलतोय, तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. एटीएम कार्ड सुरू करण्यासाठी तुमच्या मोबाइलवर ओटीपी नंबर येईल तो आम्हाला सांगा. असा फोन श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडीच्या एका वृद्धाला आला.एटीएमचा नंबर व मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगितल्यावर वृद्धाच्या खात्यावरील एक लाख रूपयांची रक्कम ऑनलाइन काढून घेतली. फसवणूक झालेले लक्षात येताच संबंधित वृद्धाने नगरच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी,श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडी येथील एक वृद्धाला मोबाइल वर फोन आला. बँकेतून बोलतोय,असे खोटे सांगून तुमचे एटीएम बंद पडले आहे. ते सुरू करावे लागेल, अशी बतावणी केली.
वृद्धाला याबाबत काहीच कल्पना नसल्याने,जवळच असलेल्या एका मुलाला मोबाइलवर बोलण्यासाठी बोलविले.वृद्धाच्या सांगण्यावरून मुलाने मोबाइलवर बोलणे सुरू केले. बँकेतून बोलतोय, आजोबांचे एटीएम बंद पडले आहे. एटीएम सुरू करण्यासाठी एटीएमचा १६ अंकी नंबर सांगा.
त्याच्या लक्षात न आल्याने व वृद्धाच्या सांगणावरून आधी त्या मुलाने वृद्धाच्या एटीएमचा १६ अंकी नंबर समोरच्या भामट्याला सांगितला. या नंतर मोबाइलवर एक एक करत दहा ओटीपी प्राप्त झाले. त्या मुलाने सर्व ओटीपी समोरच्या भामट्याला सांगितले. वृद्धाच्या खात्यावर एक लाख तीन हजार रूपये शिल्लक होते. शिल्लक असलेल्या एक लाख तीन हजारांपैकी एक लाख रूपये ऑनलाइन चोराने काढून घेतले.आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात येताच,त्यांनी सायबर सेलमध्ये धाव घेतली.सायबर सेलने याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading