दिल्लीतील विजयी हॅट्रिक नंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातही राजकीय घौडदौड करावी – शंभुसेना संघटना..
दिनांक१३ फेब्रुवारी,पुणे :
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागांवर विक्रमी विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा मा.अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याने अवघ्या भारतभर समाजसेवकांचा जल्लोष होत असतानाच आता मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवालांनी दिल्लीतील विजयी हॅट्रिक नंतर महाराष्ट्रातही राजकीय घौडदौड करावी असे कळकळीचे आवाहन शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी केले आहे.
पुणे येथील शंभुसेना संघटनेच्या संपर्क कार्यालयातुन शंभुसेना सामाजिक संघटनेचे प्रमुख मा.दिपकराजे शिर्के यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री मा.अरविंद केजरीवाल यांच्या विक्रमी विजयाबद्दल अभिनदंन पत्र पाठुन शुभेच्छा दिल्या असून.. दिल्ली तो बार बार जीती है..! महाराष्ट्र भी जितना बाकी है..! असे पत्रात लिहित आपल्या सारख्या समाजसेवक मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला नितांत गरज असल्याचे सांगत “आप पक्षाने” महाराष्ट्रात ही राजकीय घौडदौड सुरु करावी असे कळकळीचे आवाहन करत विनंती पत्र पाठवुन विनंती केली आहे.
शंभुसेना संघटनेचे प्रमुख मा.दिपकराजे शिर्के पुढे प्रसिद्धि पत्रकात दिल्लीतील आम आदमी पार्टी बद्दल लिहितात की, “आप” हा भारत देशातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्ष असून हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर समविचारी लोकांनी स्थापन केला असून भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारणा करणे, राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे मुख्य उद्देश घेऊन पक्षाची स्थापना झाली होती. म्हणूनच आता सर्व राज्यांना आप पक्षाची गरज आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व युवा समाजसेवक अरविंद केजरीवाल यांच्या मधील काही तात्विक मतभेदानंतर केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोहेंबर २०१२ रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली.
डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये “झाडू” हे चिन्ह वापरून आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यात २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षा खालोखाल आम आदमी पक्षाने दुसऱा क्रमांक पटकावत पहिल्यांदा आपले सरकार स्थापन केले होते, त्यावेळी पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २२,००० मतांनी पराभव केला होता.
२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकी मध्ये “झाडू” हे चिन्ह घेऊन लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ६७ जागांवर विजय मिळवून दुसऱ्यांदा केजरीवाल सरकार स्थापन केले होते.
आताही (२०२०) नुकत्याच झालेल्या मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकी मध्ये ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवत तिसऱ्यांदा आम आदमी पक्षाला यश मिळाल्याने अखंड भारतातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.
आम आदमी पार्टीचा इतिहास पाहिला तर या पक्षाचा जन्म २०१२ मध्ये इण्डिया अगेंस्ट करप्शनद्वारे अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या जन लोकपाल आन्दोलनाच्या माध्यमातूनच झाला होता परंतु अण्णा हजारे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन व जनलोकपाल आन्दोलनाला राजकारणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते तर अरविन्द केजरीवाल हे आन्दोलनाच्या माध्यमातून राजकरणातूनच समाजसेवेचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी एक वेगळी राजकीय पार्टी बनवून निवडणूकीत येण्याच्या विचारात होते. अण्णांच्या विचारानुसार अरविंद केजरीवाल मुळे जन लोकपाल विधेयक बनवण्यासाठी चे प्रयत्न व्यर्थ जात होते म्हणून नंतर केजरीवाल यांनी इण्डिया अगेंस्ट करप्शन द्वारे नागरिक सर्वे केला त्यामध्ये राजकारणात प्रवेश करण्याच्या विचाराला लोकांचे व्यापक समर्थन मिळाल्याने केजरीवाल यांनी २ ऑक्टोम्बर २०१२ ला राजकीय पक्ष बनवण्याची घोषणा केली अशा प्रकारे भारतीय संविधान दिवशी मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण आणि योगेन्द्र यादव इत्यादी ने अरविन्द केजरीवाल यांना साथ दिली व पक्ष स्थापन केला होता, आता आप पक्षाने सर्व राज्यात निवडणुका लढवल्या पाहिजे अशी मागणी वाढू लागली आहे.