‘ चला खेळूया’ उपक्रमाने विद्यार्थी भारावले.
“phoenix group “यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल कडुन मैदानाकडे नेण्यासाठी तज्ञ क्रिडा प्रशिक्षक यांचा कल्पक उपक्रम.

दिनांक १२ फेब्रुवारी,कर्जत:
तालुक्यातील कोंभळी येथील रयत शिक्षण संस्थेचे “न्यु इंग्लिश स्कुल अँन्ड ज्युनिअर काॅलेज आँँफ आर्टस” मध्ये नुकताच ‘चला खेळूया’ उपक्रम राबवण्यात आला.त्यावेळी तज्ञ क्रिडा मार्गदर्शकांनी विविध खेळांविषयी प्रात्यक्षिके दाखवत व माहीती देत विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी गोडी निर्माण केली.त्याने विद्यार्थी भारावुन गेले.
मैदानापासून दुरावत चाललेल्या मुलांसाठी ‘चला खेळूया’ हा उपक्रम क्रिडा क्षेत्रातील तज्ञ राष्ट्रीय खोखोचे पंच भाऊसाहेब पवार,सैन्य अधिकारी अमोल बोचरे,योग प्रशिक्षक दत्तात्रय धामणे,फिनिक्स ग्रुप चे संस्थापक नवनाथ कांगळे हे राबवत आहेत.
यावेळी बोलताना तज्ञ मार्गदर्शकांनी सांगितले की,
आधी मुलांना मैदानात खेळू द्या.त्याला ज्यात आवड आहे तो खेळ खेळूद्या.आवडणार्या खेळात त्याला प्राविण्य मिळु द्या.शैक्षणिक गुणवत्ता जेवढी महत्वाची आहे.तेवढेच आरोग्य सदृढ रहाणे ही महत्वाचे आहे. आवड असल्यास व योग्य मार्गदर्शन घेतल्यास क्रिडा क्षेत्रातही चांगले करीअर होऊ शकते.त्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्रिडा प्रकारात मोफत मार्गदर्शन करण्यासाठी व मैदान उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी यावेळी तज्ञांनी घेतली.
याप्रसंगी मुख्याध्यापक साळुंके एम.यु,दळवी डी.बी,दरेकर एस.वी,नानासाहेब उगले,बापु भगत,डाॅ.प्रकाश देवकाते,मधुकर उगले व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

