अंत्यसंस्कार झालेला मुलगा तीन वर्षांनी भेटला आई-वडिलांना.

googleची घेतली मदत

दिनांक १२ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
तालुक्यातील मढेवडगाव – श्रीगोंदा रस्त्यालगत मढेवडगाव शिवारात रस्त्याच्या बाजूला एक १६ ते १७ वर्ष वयोगटातील तरुण मागच्या आठवड्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला काही तरुणांना दिसून आला.त्यांनी लगेच सामाजिक कार्यकर्ते व मढेवडगाव ग्रा.पं.सदस्य राहुल भाऊसाहेब साळवे यांच्याशी संपर्क साधला असता ते ताक्ताळ घटनास्थळी हजर झाले.
जखमी अवस्थेतील या तरुणाला अक्षय ससाणे व इतर मित्रांच्या मदतीने डॉ.प्रविणजी नलगे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले.डॉ.नलगे यांनी त्या तरुणावर मोफत उपचार करून माणुसकीचे दर्शन घडवत त्यावर तात्काळ उपचार केले.
त्यानंतर राहुल साळवे यांनी त्या तरुणाला आपल्या घरी नेऊन त्याची कुटुंबातील व्यक्तिसारखी देखभाल केली.दरम्यान,त्याच्याशी संवाद साधत काही माहिती मिळते का?ते पहिले त्याच्या संवादावरून तो परराज्यातील असल्याचे समजले.त्यास मोडकी तोडकी हिंदी भाषा येत होती.त्याचा प्रत्येक संवाद गुगल वर तपासला असता.तो छत्तीसगड राज्यातील कोरिया जिल्ह्यातील असल्याचे प्रथमतः समजले.
गुगलच्या माध्यमातुन कोरीया जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांचा संपर्क क्रमांक मिळवला व जिल्ह्याचे (पोलिस अधीक्षक)चंद्रमोहन सिंग यांना संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली.त्यांनी तात्काळ त्यांच्या अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देत माहिती मिळवली.
यावरून,सदर तरुण तीन वर्षापासुन बेपत्ता असल्याची नोंद तेथील पोलिस स्टेशनला होती.लागलीच तेथे हेडकॉन्स्टेबल नारायण सिंह हे तरुणाच्या घरी जाऊन राहुल साळवे यांच्या मोबाईल वर व्हिडीओ कॉल करून तरुणाशी व घरच्यांशी त्यांचे बोलणे करुन दिले.त्यावेळी सदर तरुणाला व त्याच्या घरच्यांना अश्रु अनावर झाले.इतक्या दिवस बेपत्ता असल्याने घरच्यानी त्याचे अंत्यसंस्कार हि केल्याचे समजले.मात्र,संपर्का नंतर त्या तरुणास सुखरूप घरपोच करण्यात आले आहे.
सर्व कार्याबद्दल छत्तीसगड कोरिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी राहुल साळवे,अभय गुंड,प्रा.योगेश मांडे,सचिन ससाणे,राहुल एस साळवे,सनी कोळपे , अंबादास मांडे,गोरख शिंदे,गोरख राजे उंडे व मढेवडगाव करांचे विशेष आभार मानले व कोरिया भेटीचे निमंत्रण दिले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading