दिनांक २७ एप्रिल २०२६,श्रीगोंदा:
स्व अजीत पवार यांचे नेतृत्व हे विकासाचा ध्यास आणि सामान्य माणसांच्या समस्यांची जाणीव असलेले होते त्यांना श्रध्दांजली म्हणून अग्नीपंख फौंडेशनने राबविलेला एक मुठ धान्य अनाथांसाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
भविष्यात मुलांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण करणे आणि वंचितांना आधार देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम शाळांमध्ये राबविणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी श्रीगोंदा येथे बोलताना केले.
अग्नीपंख फौंडेशनने गुरुवारी एक मुठ धान्य अनाथांसाठी या उपक्रमात भाग घेतलेल्या ७२ शाळांचा कृतज्ञता सोहळा आयोजीत केला यावेळी आनंद भंडारी बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब वाघ होते.
यावेळी सर्व शाळांना उपयुक्त भेटवस्तू व दहा शाळांना सन्मानपत्र दहा सायकली भेट देण्यात आल्या. आनंद भंडारी पुढे म्हणाले की शाळा विद्यार्थी खेळाडू भारतीय जवान यांना प्रोत्साहन देणे ही अग्नीपंखची थीम चांगली आहे.
सोशल मिडीयाचा वापर कमी करण्यासाठी मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याची त्यासाठी प्रत्येक शाळेत वाचनालय तयार झाले पाहिजे प्राथमिक विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की अग्नीपंखने शाळांना आधार सामाजिक परिवर्तन करण्याच्या दृष्टीने चांगले काम चालविले आहे.
माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड म्हणाल्या की शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्वराजाची शपथ घेतलेल्या रायरेश्वर गडावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुंदर इमारत बांधून दिली.
अशा कामांची गरज आहे. यावेळी उद्योजक संजयकुमार मचे प्रविण शिंदे रामदास झेंडे डी डी भुजबळ विकास पाटील आबासाहेब जगताप यांची भाषणे झाली प्रास्ताविक अग्नीपंख फौंडेशनचे विश्वस्त दिलीपराव काटे यांनी केले.
यावेळी तहसीलदार सचिन डोंगरे गटविकास अधिकारी राणी फराटे गटशिक्षणाधिकारी कुसुमकुमारी कानडी संदीप सोमवंशी किसन वऱ्हाडे एन टी शेलार अंकुश घाडगे गोपाळराव डांगे भावना मोहीते होते सुत्रसंचलन विशाल चव्हाण यांनी केले आभार राजकुमार इथापे यांनी मानले.






Leave a Reply