श्रीगोंद्यात खळबळ: ‘फ्रेश ज्यूस’च्या नावाखाली सडलेल्या फळांचा रस; संतापलेल्या ग्राहकांनी दुकान उघडले पाडले.

दिनांक २४ एप्रिल २०२६श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील संजय सायकल मार्ट आणि आयसीआयसीआय बँक परिसरात असलेल्या एका ज्यूस सेंटरचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला.

‘फ्रेश ज्यूस’च्या नावाखाली ग्राहकांना चक्क सडलेली आणि किडलेली फळे वापरून रस पाजला जात असल्याचे समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

काल दुपारी उन्हाचा तडाखा वाढलेला असताना काही तरुण या दुकानावर ज्यूस पिण्यासाठी आले होते. यावेळी दुकानातील फळांकडे लक्ष गेले असता, त्यांना फळांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसले.

संशय आल्याने ग्राहकांनी दुकानातील फळांचे कॅरेट तपासले असता, त्यात अनेक दिवसांपासून सडलेली, बुरशी लागलेली आणि चक्क आळ्या पडलेली फळे आढळून आली.

हीच सडलेली फळे कापून त्याचा चांगला भाग ज्यूससाठी वापरला जात असल्याचे निदर्शनास आले.

हा प्रकार उघड होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार तिथे पोहोचले. लोकांचा वाढता रोष आणि आपले पितळ उघडे पडल्याचे पाहून दुकानदाराने घटनास्थळावरून पळ काढला.

विशेष म्हणजे, या दुकानाकडे अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. विनापरवाना आणि आरोग्यास घातक ठरेल अशा पद्धतीने हे दुकान राजरोसपणे सुरू होते.

याप्रकरणी स्थानिक प्रशासनाला सूचित करण्यात आले असून, संबंधित दुकानदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading