श्रीराम मंदिर वादात बापू माने यांचा हल्लाबोल: “रामभक्त म्हणवणारा नंदू ताडे रविवारी बोकड कापतो..?” – लवकरच एकनाथ शिंदेंची भेट घेणार.

श्रीगोंदा, दिनानक १३ जून २०२५

श्रीराम मंदिराच्या मालकी व व्यवस्थापना संदर्भातील वादात आता गंभीर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काल मंदिराच्या विश्वस्त नंदकुमार (नंदू) ताडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर, आज बापू माने यांनी पत्रकारांपुढे आपली बाजू मांडत नंदू ताडे व त्यांच्या समर्थकांवर परखड टीका केली.

बापू माने यांनी स्पष्टपणे सांगितले की, “श्रीराम मंदिर हे चंद्रनंदन ताडे व त्यांच्या वंशजांचे आहे. नंदू ताडे यांनी मंदिरावर बेकायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी माझ्यावर भूमाफिया व दहशतवादी वृत्तीचा असल्याचे आरोप केले, पण कोणतेही ठोस पुरावे न देता. मी असे कुठलेही गैरकृत्य केलेले नाही, उलट समाजातील वंचित बांधवांचे पुनर्वसन करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.”

“पुरावे द्या, मी स्वतः पोलिस ठाण्यात हजर होईन”
आपल्यावरील आरोपांबाबत उत्तर देताना माने म्हणाले, “जर मी गुन्हेगार असेन, तर कोणतीही FIR दाखल होण्याआधी मी स्वतः पोलिस ठाण्यात हजर होईन. पण कोणीही तथ्याविना आरोप करत असेल, तर त्याचा मला काही फरक पडत नाही.”

“नंदू ताडे नराधम, त्याला मंदिरातून हटवणार”
श्रीराम मंदिराच्या देखरेखीबाबतही बापू माने यांनी ठाम भूमिका घेतली. “श्रीराम मंदिर हे पवित्र स्थान असून त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी योग्य व्यक्तींकडेच असावी. नंदू ताडे हे मंदिरातील अनधिकृत नराधम असून त्यांना तेथून हटवण्याचा मी संकल्प केला आहे. यापुढे मंदिराची जबाबदारी चंद्रनंदन ताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडेच येईल,” असे माने म्हणाले.

“रामभक्त कसला, रविवारी बोकड कापतो?”
नंदू ताडे यांची धार्मिक निष्ठा आणि चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माने म्हणाले, “राम मंदिरासाठी मी अनेकवेळा मोलाचे सहकार्य केले आहे. माझी रामप्रती असीम श्रद्धा आहे. पण जो व्यक्ती रविवारी बोकड कापतो, तो रामभक्त कसला?” माझी भक्ती इतकी की आता परिसरात हनुमान मंदिर ही उभा करणार आहे.

“शिंदे यांची भेट घेऊन मुद्दे मांडणार”
ताडे यांच्या विरोधात खोटे दस्तावेज तयार करणाऱ्यांविरोधातही बापू माने यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “तालुकाध्यक्ष स्तरावरून खोटे दस्त तयार करून दिशाभूल केली जात आहे. हे थांबवण्यासाठी मी थेट नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला बापू माने यांनी संबोधित केले. तर चंद्रनंदन ताडे, सारंग ताडे, मंजुश्री ताडे, जमुनाबाई ताडे, शिवाजी लक्ष्मीकांत ताडे, संदीप उमाप, रमेश मखरे, उदय माने तसेच बी एम ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापू माने यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संदर्भ म्हणून विविध कागदपत्र सादर केलेले आहेत. त्याचप्रमाणे काल घेण्यात आलेल्या नंदू ताडे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सखाराम ताडे यांची वंशावळ सादर करण्यात आली होती. ज्यात धाकू सखाराम ताडे यांना वारस नाही.. असे नमूद करण्यात आले आहे.

स्रोत:(पत्रकार परिषद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading