भीम आर्मीच्या तालुकाध्यक्षला घाटात आडवून जीवे मारण्याची धमकी.. सुपा पोलीसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल..

दिनांक १९ मे २०२५, पारनेर:

भिम आर्मी पारनेर तालुका अध्यक्ष संजय सोनवणे यांना अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील सूपा (MIDC) पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, पारनेर तालुका अध्यक्ष संजय सोनवणे हे (वाडेगव्हाण) येथून काही कामानिमित्त म्हसने फाटा येथे दुचाकी गाडीवरून येत असताना नारायणगव्हाण जातेगाव फाटा घाटामध्ये दोघा अज्ञात व्यक्तींनी तोंडाला मास्क लावून लाल रंगाची स्विफ्ट गाडी आडवी लावली व म्हणाले की तू जास्त माजला काय आमच्यावर ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करतो का..? आता तुला सोडतो..!  परंतु तू परत दिसला की तुझ्या अंगावर गाडी घालून मारून टाकतो..

असे म्हणत तेथून निघून गेले व संजय सोनवणे यांनी तत्काळ सूपा पोलीस स्टेशन येथे धाव घेत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कुटे हे करत आहे.

स्रोत:(पत्रकार अमोल बोरगे)

Advertise…

Leave a Reply