दिनांक २० मे २०२५, श्रीगोंदा:
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ व मातब्बर नेते, अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आज मुंबईतील राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक क्षणी संपूर्ण राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच, श्रीगोंदा शहरात भुजबळ समर्थकांनी फटाके फोडत जल्लोष केला.

ओबीसी समाजाचे हक्काचे नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. श्रीगोंदा शहरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून एकमेकांना पेढे भरवत, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मा. पोलिस उपायुक्त कांतिलालजी कोथिंबिरे, अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख आळेकर, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, मा. उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे, सुधीर खेडकर, मुकुंद सोनटक्के, प्रशांत गोरे, नगरसेवक संतोष कोथिंबिरे, मा. चेअरमन बापूराव सिदनकर, महादू खेतमाळीस, किरण बनसुडे, महादू बोरुडे, सागर बोरुडे, दिलीप आळेकर, पोपट कोथिंबिरे, सुदाम कोथिंबिरे, लक्ष्मण कोथिंबिरे, शिवाजी राऊत, कांतिलाल कोकाटे आदींचा सहभाग होता.

कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील मंत्रिपद कार्यकाळात ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा अधिक प्रभावीपणे लढवतील, असा विश्वास व्यक्त केला.
—स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



Advertise..
