दिनांक २० ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
तालुक्यातील आधोरेवाडी येथील सुळवस्ती आणि येडे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल प्रचंड अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकनेते माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री बबनरावजी पाचपुते दादा यांच्या वतीने परीक्रमा संकुलाच्या अध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
पाहणी दरम्यान, डॉ. पाचपुते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाचपुते साहेबांच्या मार्फत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली असून, पुलाच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. डॉ. पाचपुते यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की पुलाच्या दुरुस्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल आणि वाहतूक पुन्हा सुरळीत होईल.
या पाहणीवेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अधिकारीवर्ग आणि प्रशासनानेही या परिस्थितीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
स्रोत:(राजेंद्र उकांडे)





