दिनांक १९ ऑगस्ट २०२४, अहमदनगर:
रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यकारिणी, युवक, महिला, विद्यार्थी आघाडी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाली. या बैठकीत पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्वसमावेशक निर्णय घेतला की, सध्या अस्तित्वात असलेली जिल्हा कार्यकारीणी आणि संबंधित आघाड्यांची कार्यकारिणी तत्काळ बरखास्त करण्यात यावी.
मा.ना. श्री. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार पक्षाच्या ध्येयधोरणांचा पुनर्विचार करून आगामी काळात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. या अंतर्गत मा. सुनिल साळवे यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पक्षाच्या नव्या संरचनेच्या निर्मितीसाठी प्रमुख जबाबदारी स्वीकारली आहे.
पक्ष बांधणी प्रक्रियेअंतर्गत सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून, जिल्हा कार्यकारिणीच्या नव्या नियुक्त्या, तसेच सर्व तालुका प्रमुख, युवक आघाडी, महिला आघाडी आणि विद्यार्थी आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी निवडण्यासाठी व्यापक स्तरावर प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये पक्षाच्या सर्व घटकांना सहभागी करून घेऊन पक्ष बांधणीला नवा आयाम दिला जाईल. असे स्पष्ट केले आहे. यावेळी विशाल घोडके, पप्पु घोडके, श्रीकांत घोडके सह श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
या निर्णयाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे आणि राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी स्वागत केले असून, पक्षाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.
स्रोत:(नियुक्ती पत्र व सुनिल साळवे, जिल्हाध्यक्ष RPI. आ.)






