श्रीगोंद्यात शनि मारुती मित्र मंडळाची मानाची ७० वी दहीहंडी जल्लोषात साजरी..

दिनांक १८ ऑगस्ट २०२५,श्रीगोंदा:–

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/97ixd?_ms=3.0.3

शहरातील शनिचौक परिसरात कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने शनि मारुती मित्र मंडळाच्या वतीने मानाची ७० वी दहीहंडी उत्सवाची धूम पाहायला मिळाली. चार तास रंगलेल्या या उत्सवात तरुणाईने जल्लोषात सहभाग घेतला.

मंडळाच्या मानाच्या हंडीसाठी शहरातील विविध दहीहंडी पथके उत्साहाने सहभागी झाली होती. अखेर तिसऱ्या थरावर हंडी फोडण्यात आली व विजेत्या पथकाला ३३,३३३ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी तिरंगी फुलांची सजावट, एकदंत आकर्षक लाईटिंग, चोहोबाजूंनी पाण्याचे फवारे आणि तएस ऑडियोच्या तालावर थिरकणारी तरुणाई यामुळे शनिचौक परिसर दणाणून गेला होता.

या सोहळ्याला नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रवीण काळे, सागर भागवत, चंद्रकांत धोत्रे, ॲड. वैभव मेथा, आनंद खेतमाळीस, अभिजीत काळे, फारुक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष गफ्फार पठाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

कार्यक्रमावेळी श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading