युवा उद्योजक लक्ष्मण नगरे साहेबांकडून सहारा संस्थेला ५१ हजारांची मदत; वाढदिवसानिमित्त समाजकार्यास हातभार..

दिनांक २६ मार्च २०२६, श्रीगोंदा:

शून्यातून उभ राहण्याच बळ आज नगरे साहेब यांनी सहारा सर्वांगीण विकास संस्थेला दिले सोबत विजय काकडे सर यांनीही मोलाची मदत केली.

समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि माणुसकीची भावना जिवंत ठेवणारे युवा उद्योजक लक्ष्मण नगरे साहेब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या हस्ते आज सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या कार्यालय बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले. या वेळी केवळ केक कापून वाढदिवस साजरा न करता, भारतीय संविधानातील उद्देशिका नगरे साहेब यांना देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.

याच औचित्य साधत नगरे साहेबांनी संस्थेच्या कार्यालय बांधकामासाठी तब्बल ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत  प्रत्यक्षात दिली. त्यांच्या या योगदानामुळे समाजातील गरजू आणि वंचित घटकांसाठी उभ्या राहत असलेल्या या कार्याला मोठे बळ मिळाले आहे.

कार्यक्रमात शिक्षकी पेशातून आयुष्यभर ज्ञानदान करणारे लोणी व्यंकनाथचे सुपुत्र विजय काकडे सर यांनीही ११,१११ रुपयांची मदत करून शिक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवली. तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत थोरात साहेब यांनी ५ हजार रुपयांची मदत करून या उपक्रमाला हातभार लावला.

सहारा सर्वांगीण विकास संस्थेच्या वतीने अनाथ, निराधार, ऊसतोड मजूर व कचरा वेचणाऱ्या मुलांसाठी निवासी शिक्षण प्रकल्प सुरू करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची माहिती मिळताच लक्ष्मण नगरे साहेब यांनी सर्वप्रथम मदतीचा हात पुढे केला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

या प्रसंगी विजय काकडे सर यांनी “शिक्षणासाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत” असा विश्वास देत या कार्याचे कौतुक केले. या सर्व मान्यवरांच्या मदतीतून अनेक वंचित मुलांचे आयुष्य घडणार असून त्यांना चांगला नागरिक बनण्याची संधी मिळणार आहे.

संस्थेच्या माध्यमातून एकाच छताखाली कायदे, शासन निर्णय (GR), भारतीय संविधान, मूलभूत हक्क व कर्तव्य यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

“ही मदत फक्त आर्थिक नाही, तर आमच्या कार्यावरचा विश्वास आहे,” अशी भावना व्यक्त करत सहारा सर्वांगीण विकास संस्थेने लक्ष्मण नगरे साहेब, विजय काकडे सर आणि चंद्रकांत थोरात साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी दादासाहेब नगरे,लक्ष्मण नगरे साहेब, विजय काकडे सर,

सुनील म्हस्के सर, प्रकाश काकडे, संजय काकडे,भरत काकडे, मारुती शेलार,नामजी जठार, छाया भोसले ,रवींद्र चव्हाण, बबन गोरखे, केशव दळवी, दत्ता गोसावी, उत्तम दळवी साहेब ,रवींद्र डांगे, अजय खोमणे, निखिल गोरखे,अनिल नेटवटे , मंगेश गोरखे उपस्थित होते अशी माहिती सहारा सर्वांगीण विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading