दिनांक १८ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्याचे भूमिपुत्र मेजर अशोक नामदेव सातव (नाईक) यांचा दिल्ली येथील ऐ.एम.सी.बेस हॉस्पिटलमध्ये दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम १९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता अरणगाव दुमाला, सातव वाडी येथे शासकीय इतमामात होईल.
शहीद मेजर अशोक नामदेव सातव हे भारतीय सैन्य दलातील आर्मी मेडिकल कोर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी जम्मू काश्मीर, उधमपूर, दिल्ली, आसाम यांसारख्या ठिकाणी वीस वर्षांची देशसेवा केली होती. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी, दोन चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे आरणगाव दुमाला आणि पंचक्रोशीत शोकसागर पसरला आहे. अंत्यविधीसाठी श्रीगोंदा, पारनेर, कर्जत-जामखेड, शिरूर तालुक्यांतील तसेच पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक व सैनिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
स्रोत:(पत्रकार अमोल बोरगे)





जाहिरात..

