श्रीगोंद्यात अवैध मटक्याचा उच्छाद; अंन पोलीस निरीक्षक किरण शिंदेच्या कारवाईला विलंब..?

दिनांक १८ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि बस स्थानकासमोरील परिसरात अवैध मटका व्यवसाय निर्भयपणे चालवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी अद्याप ठोस कारवाई करण्यास सुरुवात केली नसल्याचे समोर येत आहे. साहेबांनी पदभार ग्रहण केल्यानंतर शासकीय कार्यालयात सत्कार समारंभ आणि वाढदिवसाच्या खाजगी कार्यक्रमांमध्ये ते किती दिवस व्यस्त राहणार आहेत,..? असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित होत आहे.

मागील आठवड्यात पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर, किरण शिंदे यांचा शासकीय कार्यालयातच आपल्या पूर्वीच्या मित्रांनी वाढदिवस साजरा केला होता. या घटनेनंतर ते चांगले चर्चेत आले होते. एवढेच नव्हे, तर काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून सत्कार स्वीकारण्यातही ते व्यग्र असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी शिंदे साहेब कधी आदेश देतील,..? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

तर, श्रीगोंदा परिसरातील अवैध मटका व्यवसाय जोर धरत आहे. या व्यवसायाला रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक शिंदे कधी पावले उचलतील,..? आणि बस स्थानकासमोरील सरेआम चालू असलेल्या मटक्याचा अड्डा बंद करण्यासाठी पोलीस अधिकारी शिंदे यांना शासकीय कार्यालयातील सत्कार समारंभ आणि खाजगी वाढदिवस साजरे करण्यातून कधी वेळ मिळतो,..? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading