दिनांक १८ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:
तालुक्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते व सहकार क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्व कै.अंबरनाथ ऊर्फ तात्यासाहेब मारूती हिरडे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आज श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत डोंबिवली (मुंबई) यांचे किर्तन कार्यक्रमाने श्रोत्यांचे मन मंत्रमुग्ध झाले. जयेश महाराजांच्या किर्तनातील अध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांनी श्रोते अंतर्मुख झाले.
सहकार, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योग आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित किर्तनकार कांचनताई लकडे यांनी गायक व मृदंगाचार्यांसोबत एकत्र येऊन विशेष भक्तिरसाचा अनुभव दिला.
कार्यक्रमाला हिरडे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती. कै.अंबरनाथ हिरडे यांच्या (पत्नी) श्रीमती शशिकला हिरडे, (बंधू) बबनराव, नानासाहेब, शिवाजीकाका, शहाजीकाका, (मेहुणे) अजिनाथकाका झिंझाडे, (बहिणी) सुमनताई लबडे, पदमावती काळाने, रत्नमाला लबडे, चंद्रकला पुराणे, मंदोदरी झिंझाडे, सुनिता झिंझाडे, संगिता वाजे, सुरेखा कापसे, (जावई) प्रा.डॉ.सुनिल पुराणे, (कन्या) सौ.मनिषा पुराणे, (मुलं) श्री.महेश कुमार(बंडुभाऊ), डॉ.संतोष हिरडे, समस्त नातेवाईक आणि इतर कुटुंबीयांनी आपला सहभाग नोंदवला. त्यांनी या प्रसंगी तात्यासाहेबांबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या सोहळ्यात श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, अनुराधाताई नागवडे, बाळासाहेब नहाटा, अनिल ठवाळ, मनोहर पोटे, बाळासाहेब दुतारे, प्रशांत गोरे, बापूशेठ गोरे, अंबादास औटी, संग्राम घोडके, अशोक खेंडके, आप्पा सोनवणे, महावीर पटवा, नानासाहेब कोथिंबीरे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर हजर होते. उपस्थितांना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी तात्यांच्या योगदानाची आठवण करून देत सर्वांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)






