कै.तात्यासाहेब हिरडे यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा: भावपूर्ण किर्तनरूपी आदरांजली..

दिनांक १७ ऑगस्ट २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यांमध्ये सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अंबरनाथ मारूती हिरडे, ज्यांना सर्वत्र तात्यासाहेब हिरडे म्हणून ओळखले जाते, यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात येत आहे. हा सोहळा मोरेदादा हाॅस्पिटल, राजमाता शिंदे कन्या विद्यालय, काळकाई चौक, श्रीगोंदा येथे संपन्न होणार आहे.

या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तालुक्यातील तात्यासाहेबांवर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात ह.भ.प. जयेश महाराज डोंबिवली, मुंबई यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. या किर्तनातून तात्यासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. याशिवाय नवोदित किर्तनकार कांचनताई लकडे यांच्या नियोजनातून अनेक गायक व प्रख्यात म्रुदुंगाचार्य किर्तनसेवा देतील.

तात्यासाहेब हिरडे यांच्या पत्नी श्रीमती शशिकला हिरडे, बंधू बबनराव, नानासाहेब, शिवाजीकाका, शहाजीकाका, मेहूने अजिनाथकाका झिंझाडे, बहिनी सुमनताई लबडे, पदमावती काळाने, रत्नमाला लबडे, चंद्रकला पुराणे, मंदोदरी झिंझाडे, सुनिता झिंझाडे, संगिता वाजे, सुरेखा कापसे, जावई प्रा. डॉ. सुनिल पुराणे, कन्या सौ. मनिषा पुराणे, मुलं श्री. महेश कुमार (बंडुभाऊ), डॉ. संतोष हिरडे आणि संपूर्ण नातेवाईक यांच्या उपस्थितीत हिरडे साहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहिली जाणार आहे. हिरडे परिवाराच्या वतीने सर्वांना या किर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित राहाण्याचे नम्र निवेदन करण्यात आले आहे.

स्रोत:(प्रसिध्दी पत्र)

तात्यासाहेब हिरडे यांना भावपूर्ण आदरांजली.

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading