दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ श्रीगोंदा:
शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी आणि नगरपालिकेचे कर्मचारी शरद घोडके यांचे वडील तसेच पोलीस अधिकारी हृदय घोडके यांचे चुलते, स्मृतीशेष सत्यवान काशिनाथ घोडके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी, कोकणगाव रोड येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कालकथित सत्यवान घोडके यांचे श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर येथे वास्तव्य असताना सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान होते. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले आणि कृतज्ञतेने त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान, स्मृती. सत्यवान घोडके यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत, शहरातील राहुल वस्तीगृहातील मुलांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन करून त्यांच्या सामाजिक कार्याची आठवण जागवली गेली.
पूजापाठ आणि धार्मिक विधी श्री आनंद घोडके आणि बोधाचार्य श्री सतीश ओहोळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह, सिद्धार्थ नगर आणि ससाणे नगर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी काल. सत्यवान घोडके यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना, त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)






