दिनांक ३१ ऑगस्ट २०२४,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे रहिवासी असलेले, मनसेचे धडाडीचे तालुका संघटक निलेश नवले पाटील यांनी श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांचे श्रीगोंदा-नगर मतदारसंघात दौरे सध्या जोरात सुरू आहेत. धडाडीचे, दमदार आणि भावी आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले नवले पाटील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
निलेश नवले पाटील हे गोरगरीब जनतेत मिसळून राहण्यास प्रसिद्ध आहेत, आणि त्यांची ओळख गोरगरीबांचे नेते म्हणून आहे. श्रीगोंदा-नगर तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्यांच्यासाठी आपला पूर्ण पाठिंबा दर्शवत आहे. नवले पाटील हे मनसेचे कट्टर समर्थक असून तालुक्यातील विविध समस्या सोडवण्यासाठी ते कायमच आघाडीवर असतात.
श्रीगोंदा-नगर तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांपासून वाहतूक कोंडी, गटारलाईन, शाळेतील तक्रारी, सांस्कृतिक क्षेत्रातील अडचणींवर ते नेहमीच लक्ष केंद्रित करत असतात. कोणतीही समस्या समोर आली की, ते तिचं निराकरण करण्यासाठी निवेदन देऊन, आंदोलन करून आणि ऐकले नाही तर मग मनसे स्टाईलने ती समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात. या धडाडीच्या भूमिकेमुळेच त्यांना तालुक्यातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर उमेदवारी मिळवण्यासाठी निलेश नवले पाटील आपली ताकद दाखवत आहेत. जनतेतून मिळणारा पाठिंबा आणि त्यांच्या नेतृत्वातील धडाडीने श्रीगोंदा-नगर मतदारसंघात ते एक नवा अध्याय लिहिण्यास ते सज्ज झाले आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





