श्रीगोंद्यात ‘मकोका’चा दणका! सुभाष चौधरी टोळीवर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची मोठी कारवाई

दिनांक ८ जून २०२६,श्रीगोंदा:

तालुक्यात सातत्याने गंभीर गुन्हे करून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. टोळी प्रमुख सुभाष कोंडीबा चौधरी याच्यासह त्याच्या टोळीतील एकूण ८ सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका – MCOCA) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे.

अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस प्रशासनाने मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये सुभाष कोंडीबा चौधरी (टोळी प्रमुख), वैभव सुभाष चौधरी, साई संजय मदने, सुजित इथापे, मयुर गव्हाणे, नितिन गव्हाणे, नितिन पवार, चिंगा भागवत आरोपींचा समावेश आहे.

“तालुक्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यासाठी ही कडक कारवाई करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” संबंधित टोळीकडून श्रीगोंदा परिसरात सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले जात होते. त्यांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या प्रस्तावानुसार वरिष्ठ पातळीवरून या कारवाईला मंजुरी देण्यात आली.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या या धडक Action मुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारी जगतात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading