केवळ वाऱ्याच्या वेगामुळे ‘आकाशगंगा फेज-१’ची कंपाउंड भिंत कोसळली; बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न..

मांडावगण रोड येथील घटना; तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची रहिवाशांची मागणी.

श्रीगोंदा (दिनांक ७ जून २०२६):

आज मांडावगण रोडवरील ‘आकाशगंगा फेज-१’ या निवासी प्रकल्पाची कंपाउंड भिंत केवळ वाऱ्याच्या वेगामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे या संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माहिती स्थानिक नागरिक प्रसाद काटे यांनी दिली असून, या निष्कृष्ट बांधकामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या वाऱ्याच्या झोताने जर एवढी मोठी भिंत कोसळू शकते, तर भविष्यात येथील इमारतींना किंवा नागरिकांना किती मोठा धोका असू शकतो, याची भीती आता रहिवाशांना सतावते आहे. “उद्या येथे आणखी एखादी मोठी दुर्घटना घडणार नाही याची हमी कोण देणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित शासकीय व प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. या प्रकल्पाच्या संपूर्ण बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता यांची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

भविष्यात या ठिकाणी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी कोणाची असेल, हे निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून दोषींवर आणि संबंधित बिल्डरवर योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रसाद काटे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्रोत:(प्रसाद काटे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading