श्रीगोंद्यात स्वयंघोषीत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा जातीयवादी उच्छाद.! आदिवासी पारधी आणि मागासवर्गीय समाज  जनआंदोलनाच्या तयारीत..!

दिनांक १७ जुलै २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यात काही दिवसांपूर्वी रुजू झालेल्या एका स्वयंघोषित दबंग अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत आदिवासी पारधी समाजाला लक्ष्य केले आहे.

या अधिकाऱ्याच्या जातीयवादी वृत्तीमुळे आणि प्रशासकीय कार्यालयात होत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे संपूर्ण तालुक्यातील समाजात संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरुद्ध आता आदिवासी आणि मागासवर्गीय समाज एकवटला असून, लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अधिकारी कोणातरी राजकीय नेत्याच्या वरदहस्ताने किंवा स्वतःच्या जातीय मानसिकतेतून पारधी समाजाला मुद्दाम त्रास देत आहे. कामाच्या निमित्ताने कार्यालयात येणाऱ्या पारधी समाजातील नागरिकांना हुसकावून लावणे, त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलणे आणि त्यांचा द्वेष करणे असे प्रकार दररोज घडत आहेत.

इतकेच नव्हे तर, मागासवर्गीय समाजातील लोकांविरुद्ध स्वतःच्या मर्जीतील माणसे हाताशी धरून त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे कारस्थानही या अधिकाऱ्याकडून रचले जात असल्याचे उघड झाले आहे.

या अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे पीडित समाजाने पुरोगामी चळवळीतील आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या विरोधात तक्रार नोंदवली आहे. प्रशासनाच्या वर्तुळात अशा प्रकारची वर्तणूक लोकशाहीला काळीमा फासणारी असून, या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सदर अधिकाऱ्याची जातीयवादी मानसिकता आणि दडपशाही खपवून घेतली जाणार नाही.  आदिवासी आणि मागासवर्गीय समाज याबाबत लवकरच समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading