“छावा” सिनेमावर वादाची छाया: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा आक्षेप, लक्ष्मण उत्तेकर यांची माफी अपुरी – दिपकराजे शिर्के यांचा रोष..

दिनांक २२ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा/पुणे:

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या आगामी चित्रपटावर वादाची छाया पडली आहे. चित्रपटातील गणोजी शिर्के यांच्या व्यक्तिरेखेबाबत त्यांच्या वंशजांनी तीव्र आक्षेप नोंदवले असून, इतिहासाची तोडमोड करून शिर्के कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वंशजांचा आक्षेप:
गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के (पेडगाव, श्रीगोंदा) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत आपला आक्षेप मांडला. “छावा सिनेमात गणोजी शिर्के यांना जाणीवपूर्वक फितूर दाखवले आहे. हा प्रकार केवळ इतिहासाचे विकृतीकरण नसून आमच्या कुटुंबाची बदनामी करण्याचा कट आहे,” असे दीपक शिर्के यांनी सांगितले. त्यांनी चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

दिग्दर्शकाची प्रतिक्रिया:
या वादानंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी शिर्के कुटुंबाची माफी मागितली आहे. एका वृत्तवाहिनीवरील फोनवरील संभाषणात त्यांनी भूषण शिर्के यांच्याशी संवाद साधला. “सॉरी, मी तुमचा फोन उचलू शकलो नाही. पण मी तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि मेसेज वाचला. जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे उत्तेकर यांनी सांगितले.

उत्तेकर यांच्या नुसत्या माफी ने राजेशिर्के परिवारचे समाधान होणार नाही-  वंशज दिपकराजे शिर्के..

संबंधित वादग्रस्त छावा चित्रपटात गणोजी व कान्होजी यांचे फितूरी करताना स्पष्ट उल्लेख तथा येसुबाई यांच्या तोंडुन भावाबद्दल फितूरी केल्याचे संवाद दाखवले आहेत.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Advertise..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading