दिनांक २२ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
शहरातील रस्त्यांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नगरसेविका सौ. सीमाताई प्रशांत गोरे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या १५ लाख रुपयांच्या निधीतून विविध डिव्हायडर सौंदर्यीकरण कामांचा शुभारंभ नुकताच पार पडला.

या कामांचा शुभारंभ श्रीमती पुष्पगंधा भगतमॅडम (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगर परिषद) यांच्या हस्ते तुळशीदास चौक, पेडगाव रोड येथे संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

निधीतून होणारी कामे:
- संभाजी महाराज चौक ते फुटरस्ता: डिव्हायडरमध्ये माती भरून रंगरंगोटी करण्यात येणार असून, आकर्षक वृक्षारोपण केले जाईल.
- तुळशीदास चौक ते नितीन कादबने यांच्या घरापर्यंत: डिव्हायडरमध्ये माती भरून रंगकामासह हिरवाईसाठी झाडे लावली जातील.
- वेळू रोड ते डॉ. होले यांच्या घरापर्यंत: येथेही डिव्हायडरमध्ये माती भरून, रंगरंगोटी करणार असून, पर्यावरणपूरक वृक्षारोपण केले जाईल.

उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमास ज्योतीताई खेडकर (उपनगराध्यक्ष), मीराताई शिंदे (शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख), नगरसेवक सीमाताई प्रशांत गोरे, नगरसेवक संतोष कोथिंबीरे, नगरसेवक निसारभाई बेपारी, नगरसेवक मनीषाताई वाळके, माजी उपनगराध्यक्ष अर्चनाताई गोरे, इबटा संघटनेचे राज्याध्यक्ष मा. उत्तरेश्वर मोहळकर सर, उद्योजक पांडुशेठ पोटे, सामाजिक कार्यकर्ते मा. सतीश बोरुडे, शिवजन्मोत्सव समितीच्या उपाध्यक्ष चांदणीताई खेतमाळीस व अश्विनीताई कोथिंबीरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी:
आंबेकर (इंजिनियर, श्रीगोंदा न. प.), न. प. कर्मचारी सुपेकर, मा. शेखरजी साळुंखे (ठेकेदार), इंजिनिअर वसीमभाई जमादार, निखिलजी होले यांनी देखील कार्यक्रमासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. डिव्हायडर सौंदर्यीकरणामुळे शहरातील रस्ते अधिक आकर्षक व सुरक्षित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नगरसेविका सौ. सीमाताई गोरे यांच्या प्रयत्नांची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
