दिनांक ९ मार्च २०२६ श्रीगोंदा:
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने महिलांसाठी विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाद्वारे शहरातील महिलांच्या गुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यावरही भर देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शिंदे यांनी दिली.

येत्या गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी पंतनगर येथील कम्युनिटी हॉलमध्ये हा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्याप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या गृहिणी कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येईल.

महिलांच्या विविध कला गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीगोंदा शहराच्या शाश्वत विकासासाठी महिलांकडून प्रत्यक्ष सूचना आणि संकल्पना मागवण्यात येणार आहेत. यासाठी विशेष ‘सजेशन बॉक्स’ ठेवण्यात येणार असून, महिलांनी आपल्या नावासह आपल्या कल्पना चिठ्ठीद्वारे त्यात टाकायच्या आहेत.

कार्यक्रमात आयोजित पाककला स्पर्धा, विविध गुणदर्शन आणि ‘शहर विकास संकल्पना’ या तीनही विभागांतर्गत प्रत्येकी तीन विजेते निवडले जातील. नगरपरिषदेच्या वतीने या विजेत्यांना सन्मानित करून बक्षिसे देण्यात येणार आहेत.
हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनिताताई खेतमाळिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष अलकाताई अनुभले, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, महिला व बालकल्याण उपसभापती ॲड. दिपाली बोरुडे यांच्यासह सर्व नगरसेवक विशेष उपस्थित राहणार आहेत.
सभापती मिराताई शिंदे यांनी शहरातील सर्व महिलांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी ११ मार्च २०२६ रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क:
* अशपाक अत्तार: ९४२३४८५८१६
* ज्योत्स्ना ननवरे: ९७६७०६०६०७
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेचा हा प्रयत्न शहरात कौतुकाचा विषय ठरत असून, या उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
