श्रीगोंदा तालुक्यात अवैध दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्काचा धडाका; ताडी विक्रीला अधिकृत परवानगी नाही!

दिनांक ८ मार्च २०२६ श्रीगोंदा:

अवैध मद्यविक्री आणि हातभट्टीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहिल्यानगरने श्रीगोंदा तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. काल, ७ मार्च २०२६ रोजी तालुक्यातील विविध हातभट्टी, देशी दारूची दुकाने आणि ताडी विक्री केंद्रांवर एकाच वेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली.

तालुक्यातील वाढत्या अवैध व्यवसायांमुळे सर्वसामान्यांचे आरोग्य आणि शांतता धोक्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील काही सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत विभागाने ही धडक कारवाई केली.

या कारवाईदरम्यान राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यात चालणाऱ्या ताडी विक्रीबाबत महत्त्वाची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, श्रीगोंदा तालुक्यात ताडी विक्रीसाठी कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी कोणासही देण्यात आलेली नाही.

तालुक्यात कोठेही ताडी विक्री सुरू असल्यास ती पूर्णतः अवैध मानली जाईल. अशा अड्ड्यांवर यापुढेही कठोर कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.

शनिवारी झालेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. केवळ एक दिवसाची कारवाई न थांबता, यापुढेही तालुक्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सातत्याने तपासणी मोहीम राबवली जाईल, असा विश्वास उत्पादन शुल्क विभागाने व्यक्त केला आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading