दिनांक २२ जून (येळपणे,श्रीगोंदा):
तालुक्यातील येळपणे येथील खंडेश्वर मंदीरामध्ये चोरी करणारे सराईत गुन्हेगार गुन्ह्यातील मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद करण्यात आले आहेत. दिनांक १३ जून २० रोजी रात्री १०.०० ते दिनांक १४ जून २० रोजीचे च्या सकाळी ०४.३० वाजनेच्या पुर्वी येळपणे गावालगत खंडोबा मंदीराचे बंद दरवाजाचे बाहेरील कडी, कोयंडा तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने मंदीरात प्रवेश करुन लोखंडी तिजोरीत ठेवलेले १,७०,०००/- रु. किंमतीचे चांदीचे व पितळी पंचधातुचे खंडोबा देवाचे मुखवटे, चांदीचे लहान मोठे घोडे, सोन्याचा बदाम, सोन्याचे दोन मनी मंगळसुत्र वगैरे मुददेमाल चोरुन नेलेबाबत मंदीराचे पुजारी फिर्यादी नामे किसन शंकर साबळे (वय -६०) रा. येळपणे यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन बेलवंडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नं. २०८/२०२० भा.दं.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन श्री. अखिलेश कुमार सिंह (पोलीस अधिक्षक, अहमदनगर) यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे श्री.दिलीप पवार(स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर)यांनी सदर गुन्ह्याच्या तपासकामी स्वतंत्र पथकाची नेमणुक करुन, तपासाबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व कर्मचारी हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, पो. नि. दिलीप पवार यांना तांत्रिक व गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा हर्षा काळे रा. देऊळगाव सिद्धी याने त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे.
सदर खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव सिद्धी येथे जावुन आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती घेतली असता, सदर आरोपी हा देउळगाव सिद्धी येथील डोंगर भागात लपुन बसला असल्याची माहिती मिळाल्याने, पथकाती अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा लावुन व पाठलाग करुन आरोपी हर्षद ऊर्फ हर्षा हबऱ्या काळे (वय.२९) रा. देऊळगाव सिद्धी ता. जि. अ. नगर यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता, त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. नंतर, पुन्हा त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याचे सांगुन, साथीदारांची नावे सांगीतली.
आरोपीचे गुन्ह्यातील साथीदार संतोष ऊर्फ सक्तेश रकड्या भोसले (वय २९) रा. देलवाडी ता. दौंड जि. पुणे व एक अल्पवयीन साथीदार यांना यापुर्वी दिनांक.१७ जून २०२० रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २८७/२०२० भा.दं.वि. कलम ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेले आहे. तसेच, श्रीखंड्या जिवलाल चव्हाण (वय.३५) रा. रेणुका माता मंदिरामागे, केडगाव अ. नगर यास केडगाव येथुन ताब्यात घेण्यात आले आहे.
(स्रोत:अहमदनगर पोलीस)
