दिनांक २२ जून,श्रीगोंदा:
शहरातील हॉटेल सिध्दी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. मिसाळ व पो.कॉ. वेठेकर यांचे पथकाने दिनांक २० मे रोजी बोगस धाड दाखवत, त्यांच्याकडील रोख रकमा काढून घेऊन १,३५,८२५/- रुपयांचा अपहाराचा आरोप करत, २२ जून रोजी सकाळी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
मच्छिन्द्र सुद्रीक, संतोष बोळगे, शरद गांजुरे यांनी नमूद पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निवेदन जिल्हा पोलीसांना सादर केले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या अश्या डुप्लिकेट कारवाईनां साधारण माणसे सर्रास बळी पडत आहेत. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, लाखोंचा गंडा पोलीसच घालत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे व नमूद बोगस कारवाई संदर्भात सविस्तर चौकशी करावी.यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
वारंवार नमूद पोलीस कर्मचारी तालुक्यात वाळू, जुगार, मटका, दारू, अश्या अवैद्य धंद्यावाल्यानां हेरत कारवाईची धमकी देऊन, स्वहित साधत असल्याचे अनेकांनी आरोप केले असून, काहींनी यापूर्वी ही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनही केल्याचे सर्वश्रुत आहे.
अश्याच प्रकारे शहरातील सिद्धी हॉटेलवर हॉटेलच्या व्यवहारासाठी जमलेल्या मालक, चालक, मध्यस्थी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या समवेत आलेल्या इसमांना लक्ष बनवीत, दिनांक २० मे रोजी चारजण करमणुक म्हणून पत्त्याचा रमी हा मनोरंजनाचा खेळ विना पैशाचा खेळत असताना, अचानकपणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने धाड टाकुन, तुम्ही जुगार खेळत असल्याची आम्हांला खबर मिळाली आहे. असे सांगत सगळ्यांना एका खोलीत जमविले. त्यानंतर एकेकाची अंग झडती घेऊन, प्रत्येकाच्या खिशातील रक्कम काढून, त्या खोलीतील पत्त्यावरती टाकुन फोटो काढून घेतले. त्यानंतर सर्वांना एकाच गाडीत बळजबरीने बसवुन, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रत्येक्षात जे घडलेच नाही.त्याचा विपर्यास करून ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून प्रत्येकाच्या खिशातून जमा केलेली १ लाख ४५ हजार रुपये रक्कम नमूद न करता, फिर्यादीत किंवा सरकारी दफ्तरी फक्त १० हजार १०० रुपये नोंद करण्यात आली असून,त्याविरोधात श्रीगोंदा तहसिल कार्यालया समोर पीडितांनी आमरण उपोषण सुरू केले होते.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सदर प्रकरणाची चोकशी चालू असून, सद्या शहरात कोरोना रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांनी सांगितले की, शहरातील कोरोना आजाराची परिस्थिती लक्षात घेऊन, काही काळासाठी उपोषण थांबवा. या त्यांच्या विनंतीस मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याचे मच्छिंद्र सुद्रिक, संतोष बोळगे यांनी मध्यमांना सांगितले आहे.
नमूद प्रकरणी पोलिसांची व खात्याची आपल्या कार्यातून बदनामी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी योग्य वेळ ठरवून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यासंदर्भात रूपरेखा ठरवणार असल्याचे पीडित मच्छिंद्र सुद्रिक,संतोष बोळगे व शरद गांजुरे यांनी निश्चित केले आहे. न्याय मागणार.मात्र,जिल्हा पोलिस प्रशासनाच्या दारात. अशी भूमिका हे आंदोलन सोडल्यानंतर आंदोलकांनी घेतली आहे.
