श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्ट, कोळगाव दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान..

दिनांक ६ जुलै २०२४ कोळगाव, श्रीगोंदा:

श्री संत माऊली ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोळगाव येथील माऊली मंदिराच्या श्री ज्ञानेश्वर माऊली देवस्थान ट्रस्ट कोळगाव आयोजित आषाढी वारी पायी दिंडी सोहळा ६ जुलै रोजी मार्गस्थ झाला असून यंदाचे हे २३वे वर्ष असल्याचे या देवस्थानचे अध्यक्ष ह भ प मधुकर काका लगड यांनी माहिती दिली.

ह भ प मधुकर काका लगड यांनी पुढे सांगितले की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष कोळगाव येथील माऊली मंदिराच्या ठिकाणी भेट दिली होती. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या परिसरात माऊलींचे भव्य असे मंदिर उभारले असून परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण व लाईटची व्यवस्था केल्याने हे ठिकाण भाविकांचे आदरस्थान झाले असून, विविध कार्यक्रमांचे मुख्य केंद्र बनले आहे.

यंदाचे हे २३वे वर्ष असून दरवर्षी परमपूज्य गुरु स्वामी परमहंस आनंदाश्रम स्वामी (दंडी) यांच्या कृपाशीर्वादाने व ह भ प पांडुरंग महाराज क्षीरसागर यांच्या प्रेरणेने (कन्हेरमळा) कोळगाव ठिकाणावरून आषाढी वारी पायी दिंडी मार्गस्थ होत असते. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी होत असतात त्यामध्ये आबाल वृद्धांपासून महिला व तरुणांचा ही सहभाग उल्लेखनीय असतो. सुनियोजित व योजनाबद्ध रीतीने दहा दिवसांचा हा सोहळा पंढरपूर येथे १५ जुलै रोजी प्रवेश करणार असून आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी सांगता होणार आहे, अशी माहिती श्री लगड यांनी दिली.

या दिंडीची व्यवस्था प्रमुख विश्वस्त व दिंडी चालक मधुकर काका लगड, नितीन लगड, शरद लगड, प्रशांत लगड, प्रवीण लगड, राजेंद्र दळवी व अक्षय लगड, विलास डूबल, सागर नलगे हे पाहतात.

दिंडी मधील वारकऱ्यांना चहापाणी, नाश्ता, विश्रांती, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यासाठी विविध अन्नदाते नियमित उत्सुक असतात. त्यामुळे पायी दिंडी वारी सोहळा सुकर होऊन पंढरपूर येथे अत्यंत आनंदाने वारकरी पांडुरंग व रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन माघारी परततात.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading