आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोळाईदेवी विद्यालयाचे उत्तुंग यश.. नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक..


दिनांक ६ जुलै २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील श्री. कोळाईदेवी विद्यालयाने याही वर्षी आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातील एकूण ४५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. यातील नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. श्रीगोंदा तालुक्यातील श्री. कोळाईदेवी विद्यालयाने याही वर्षी आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यालयातील एकूण ४५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २७ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले. यातील नऊ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले.

या शिष्यवृत्ती परीक्षेत, अथर्व शरद लगड (तालुक्यात द्वितीय), उत्कर्षा शरद राऊत, अदिती आण्णा लगड, समृद्धी पांडुरंग मेहेत्रे, सार्थक सयाजी शिंदे, रोहित आदिनाथ बांदल, जान्हवी अविनाश मेहेत्रे, सोहम रावसाहेब मेहेत्रे आणि सार्थक सुनील लाटे या विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे, विभाग प्रमुख जयश्री झिने, विषय शिक्षक प्रवीण कुमार लोंढे, सोनाली कळसकर, वैशाली गाडेकर, शुभांगी भोईटे आणि पल्लवी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वृंद, स्पर्धा परीक्षेची नियोजनबद्ध तयारी, विशेष मार्गदर्शन आणि भरपूर सराव यामुळे विद्यालयाने हे यश संपादन केले.

विद्यालयाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा कविता मेहेत्रे आणि आदिनाथ बांदल यांनी शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला.

जाहिरात..

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दादा लगड, उपसरपंच माया मेहेत्रे, रावसाहेब मेहेत्रे, अनिल लगड तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे पालक, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे यांनी विद्यालय उत्तरोत्तर यशाचे उंच शिखर गाठेल अशी आशा व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कार्ले यांनी केले.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading