संदीप उमाप: सिद्धार्थनगर ससाणेनगर जि. प. प्रा. शाळेसाठी प्रयोगशाळा व संगणक संचासह खोली मिळावी..
दिनांक ६ जुलै २०२४,अहमदनगर:
आज राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अहमदनगर दक्षिण मतदार संघाचे खासदार नीलेश लंके यांना सिद्धार्थनगर ससाणे नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी प्रयोगशाळा आणि संगणक संचासह खोली मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहिती अशी की, सिद्धार्थनगर ससाणे नगर येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मुले मुली शिक्षण घेत आहेत. शाळेची पटसंख्या सुमारे १८० इतकी असून हे सर्व विद्यार्थी अनुसूचित या प्रवर्गातील आहेत. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापनात प्रयोगशाळेची नितांत गरज आहे. तसेच विद्यार्थ्यांना संगणक ज्ञानप्राप्ती होण्यासाठी संगणक संचासह संगणक खोलीची आवश्यकता असल्याचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संदीप उमाप यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी लंके साहेबांनी शाळेबद्दल विचारपूस करून निवेदन बारकाईने वाचून लवकरात लवकर दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.
या प्रसंगी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, जितेंद्र पाटोळे, सुभाष ससाणे, नेवासे तालुकाध्यक्ष सतीश थोरात, पारनेर तालुका कार्याध्यक्ष नितीन मुरकुटे उपस्थित होते. निवेदनावर रावसाहेब घोडके, आनंद घोडके, रमेश मखरे, विजय कानगुडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
संदीप उमाप: सिद्धार्थनगर ससाणेनगर जि. प. प्रा. शाळेसाठी प्रयोगशाळा व संगणक संचासह खोली मिळावी..
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)





