दिनांक १३ जुलै, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील साळवन देवी रोड येथे वास्तव्यास असलेल्या ज्ञानेश्वर तुकाराम धुमाळ यांच्या दोन वर्षीय बोकडाची तालुकाभर चर्चा आहे. कारण या बोकडाच्या कपाळावर चंद्रकोर व चांदणीची निशाणी असल्याने या लाखात लाख मोलाचा असलेल्या चंद्रकांत (बोकडाला) पाहण्यासाठी आता तालुक्यातून लोक येत आहेत.
शेळी पालनामध्ये लाखो बोकडांमध्ये एखाद्या बोकडाच्या कपाळावर मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या चांद ताराची निशाणी येते. या अपवादात्मक निशाण असणाऱ्या बोकडांना बकरी ईदसाठी महत्त्व असते. अशाच एका चंद्रकांत नामक बोकडाची सध्या श्रीगोंदा तालुक्यात व आसपास चर्चा रंगली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील साळवनदेवी रोड लगत राहणारे ज्ञानेश्वर तुकाराम धुमाळ यांच्याकडे असलेल्या बोकडाच्या कपाळावर चंद्रकोर आणि चांदणीची निशाणी आहे. त्यामुळे धुमाळानीं त्यांच्या बोकडाचे नाव चंद्रकांत ठेवले आहे. चंद्रकांत सध्या दोन वर्षांचा असून, त्याची लांबी चार फूट, उंची चार फूट आणि वजन साधारण ५० किलो आहे. चंद्रकांत रंगाने संपूर्ण काळा असून, त्याला पेंड, वैरण, घास, शेंगदाणा पेंड, शेंगा असा खुराक दिला जातो.
चंद्रकोर आणि चांदणी अशी निशाणी असलेल्या बोकडाला मुस्लिम धर्मियांच्या बकरी ईद मध्ये कुर्बानीसाठी महत्त्व मानले जाते. या चंद्रकांत बोकडाला पाहण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी ज्ञानेश्वर तूकाराम धुमाळ यांच्या मोबाईल क्रमांक ९९ ७० ५० २१ ३४ वर संपर्क करावा. असे चंद्रकांतचे मालक धुमाळ यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(ज्ञानेश्वर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार)

