दिनांक १४ जुलै, श्रीगोंदा:
दिनांक ११ जुलै रोजी अहमदनगर दौंड रोड वर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उत्तरप्रदेश मधील एक ट्रक नगर मधून दौंड च्या दिशेने जात होती. या ट्रकमध्ये २५ टन मका जी कन्नोज उत्तर प्रदेश मधून मिरज, सांगली येथे पोहोच करायची आहे. मात्र मध्येच या ट्रक मधील ड्रायव्हर व क्लिनर सोबत काही अनपेक्षित घडले.

सविस्तर माहिती अशी की, दिनांक ६ जुलै रोजी रात्री नमूद ट्रक झाशी, शिवपुरी, गुना, उज्जैन, इंदोर, धुळे, मालेगाव, अहमदनगर या मार्गे दौंडच्या दिशेने जात असतांना अहमदनगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी गाडीचा ड्रायव्हर व क्लिनर थांबले. ड्रायव्हरने सोबत आलेल्या क्लीनरला हॉटेलच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपावरून ऑइल आणण्यास सांगितले. ऑइल घेऊन परत येत असतांना ड्रायव्हर कोणाशी तरी ?.. कहा पे हो.. ? असे म्हणत बोलत असतांना क्लीनरला पाहून त्याने फोन बंद केला.
यानंतर ट्रक घेऊन श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील लोणी व्यंकनाथ येथील रेल्वे गेट ओलांडून पुढे आल्यावर दोन अनोळखी इसमाने ट्रक ओव्हरटेक करून गाडी रस्त्याच्या बाजूला लावली. यावेळी ट्रक ड्रायव्हर गाडीतून खाली उतरून मोटरसायकलवर आलेल्या व्यक्तीच्या ताब्यात ट्रक देऊन तो मोटारसायकल वरील इसमा सोबत पुढे निघून गेला. ट्रक चालवायला बसलेल्या व्यक्तीने श्रीगोंद्यातील बाबुर्डी गावचे शिवारात निर्जन ठिकाणी ट्रक नेऊन गाडी ड्रायव्हर व क्लिनरला लांब नेत त्यांच्याजवळ दोन इसम थांबवले व गाडीत भरलेली २५ टन मका दुसरी एक ट्रक आणून त्यात भरली. यानंतर दोन तासाने नमूद दोन्ही इसमांना त्या अज्ञात लोकांनी याबाबत कोणाला सांगितल्यास ? जिवे मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादी वरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. असून, या गुन्ह्यात ट्रक ड्रायव्हरही सामील असल्याचे त्या क्लीनरणे फिर्यादीत सांगितले आहे. Shrigonda .. It happened in the middle of the night that embarrassed the storyteller in the movie.!
उत्तर प्रदेश ते श्रीगोंदा प्रवासादरम्यान ड्रायव्हरने अज्ञात व्यक्तीशी संपर्क करून, १५ लाख रुपये किमतीची मका एका ट्रक मधून दुसऱ्या ट्रक मध्ये भरण्यासाठी अंधाराचा फायदा घेत केलेले नियोजन एखाद्या चित्रपटातील कथानकालाही लाजवेल अशा पद्धतीने करण्यात आल्याचे या घटनेतून समोर येते आहे.
स्रोत:(दिनांक ११/७/२०२१ रोजी दाखल फिर्याद)

