दिनांक १५ जुलै, श्रीगोंदा:
पुण्यातील एका टोळक्याने श्रीगोंदयातील इसमाला अडवून दगड व लोखंडी पंचच्या सहाय्याने मारहाण केली आहे. तसेच, त्याच्यावर दहशत करत, त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा तीन हजार रुपयांचा ऐवज लुटला असल्याची तक्रार त्याने पोलिसांत दिली आहे.

योगेश दत्तु धांडे (वय – ३८, रा. श्रीगोंदा) यांनी लोणींकद पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत फिर्याद दिल्यानंतर दोन संशयित मुलांसह चौघांविरुद्ध पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

नमूद प्रकरणी अधिक तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे (पोलिस उपनिरीक्षक) किरण वराळ करीत आहेत. Ismas from Shrigonda was beaten and looted in Pune ..!
स्रोत:(ऑनलाइन न्यूज)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
