दिनांक १९ जुलै, श्रीगोंदा:
श्रीगोंदयातील शेतकऱ्याचा शेती माल ऑनलाईन पध्दतीने विकत घेण्याचे प्रलोभन दाखवत, त्याची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नालासोपारा, ठाणे येथे घडला. याप्रकरणी हंगेवाडीतील शेतकऱ्याने नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नमूद फिर्यादीवर स्थानिक पोलिसांनी तपासाला वेग देत निव्वळ २४ तासात यातील आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील शेतकरी अमोल दगडू परे यांचे शेतातील डाळिंब ऑनलाईन खरेदीच्या बहाण्याने त्यांची अश्याप्रकारे फसवणूक करण्यात आली होती. Fraud of farmers in Shrigonda in Thane ..! Type of online purchase of agricultural commodities ..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, यातील आरोपींनी परेनां ऑनलाईन डाळिंब खरेदी केल्याचं सांगत, तो माल घेऊन नालासोपारा, ठाणे येथे बोलावले. त्यांच्याकडून आरोपींनी साधारण ८८ हजार रुपयांचे ११२ कॅरेट डाळिंब ताब्यात घेतले. मात्र, डाळिंब घेतल्यानंतर आरोपींनीं परे यांना पैशांसाठी लांबड लावली. पैसे देण्यासाठी आरोपींनी नमूद शेतकऱ्याची दिशाभूल करत ते फरार झाले. अखेर परे यांनी नमूद प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांची फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली.
वेगाने तपास सुरू करत, कारवाई दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सी.सी.टीव्ही. फुटेज व आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. त्यावरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अवघ्या २४ तासात पिकअप टेम्पो सह २ आरोपींनां पकडण्यात पोलिसांना यश आले. प्रकाश उमेश चौधरी (वय २५) व मोहम्मद अजय सलीन रायनी (वय २९) अशी यातील आरोपींचे नावं आहेत. तर, ते दोघे वसई येथील रहिवासी आहेत.
स्रोत:(ऑनलाइन न्यूज)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

