वयोवृद्धां विरुद्ध बळाचा वापर करत, घर केलं जमीनदोस्त..! श्रीगोंदयातील संतापजनक घटना..!

दिनांक १९ जुलै (हिरडगाव, श्रीगोंदा):

येथील सरस्वती निवृत्ती दरेकर या ७५ वर्षीय वृद्धेचे गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी घर पाडून तिला बेघर केले आहे. अनेक वर्षांपासून वृद्धा त्या घरात राहत होती. तिने गयावया करूनही तिच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत, बळजबरीने घरात घुसून, भिंती पाडत संपूर्ण घरच उध्वस्त करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वयोवृध्द महिलेने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर असे की, हिरडगाव फाट्याच्या पुढे काही अंतरावर असलेल्या दरेकर वस्ती येथे सरस्वती निवृत्ती दरेकर या अनेक वर्षांपासून राहत आहेत. त्यांना दोन मुले असून, त्या मुलांपासून विभक्त राहतात. त्यांच्या घराशेजारी असणाऱ्या भावकीतील लोकांनी शेताची मोजणी झाल्यावर वृध्द सरस्वती यांना दिनांक १७ जुलै रोजी तुझे घर आमच्या हद्दीत येत आहे. असे सांगून बाहेर निघण्यास सांगितले. Landlords using force against the elderly ..! Incidents in Shrigonda that provoke anger ..!

सरस्वती दरेकर यांनी त्यांना विनंती केली. की थोडे दिवस थांबा मी घर सोडून जाते. परंतु, तिच्या विनंतिकडे दुर्लक्ष करत, गुंड प्रवृत्तीच्या भानुदास लक्ष्मण दरेकर, तुळशीराम लक्ष्मण दरेकर, किरण भानुदास दरेकर व लक्ष्मण भिकाजी दरेकर यांनी तिचे काहीही म्हणणे न ऐकता असंविधानिक पद्धतीने घरात घुसून भिंती पाडण्यास सुरुवात केली. घरातील वस्तू बाहेर फेकत संपूर्ण घर जमीनदोस्त केलं आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

या सर्व प्रकारामुळे वृद्धेला रस्त्यावर आणुन वरील भावकीतील चौघा जणांनी वृद्धेवर मोठा अन्याय केला आहे. याप्रकरणी सरस्वती दरेकर यांनी भानुदास लक्ष्मण दरेकर, तुळशीराम लक्ष्मण दरेकर, किरण भानुदास दरेकर व लक्ष्मण भिकाजी दरेकर यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादंवी कलम ४२७,४५२ व ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

स्रोत:(दिनांक १७/०७/२१ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद)

Leave a Reply