दिनांक २० जुलै, श्रीगोंदा:
तालुका पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील एका गावात वास्तव्यास असलेल्या त्या विवाहितेचा पती भोळसर असल्याचा गैरफायदा घेत, महिलेचा चुलत दीर मागील एक वर्षापासून तिचा पाठलाग करीत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असले बाबत तक्रार पीडित महिलेने दिली आहे.

दिराने शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला महिलेने फिर्याद दाखल केली आहे. Shrigonda .. I want to have sex with you at night! Cousin Dira tries to take advantage of the fact that the woman’s husband is naive ..!
याबाबत दिलेल्या तक्रारीत तीने नमूद केले आहे की, पती, दीर व मुलगा यांचे सोबत ती नमूद ठिकाणी रहिवासी असून, शेती व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह आहे. तिचे पती भोळसर असल्याने तिचा चुलत दीर याचा गैरफायदा घेत, मागील एक वर्षापासून महिलेचा पाठलाग करून, तिला छेडण्याचा प्रयत्न करत आहे.
दिनांक १६ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास नमूद महिला तिच्या घरासमोर वस्तीवर असतांना तिथे तिचा चुलत दीर आला व महिलेला बोलला की, मला आज रात्री तुझ्यासोबत शरीर संबंध ठेवायचा आहे. मी रात्री येतो. यावर महिलेने त्याच्या प्रत्येक म्हणण्याला नकार दिल्याने, त्याने महिलीच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर नमूद महिलेने थेट श्रीगोंदा पोलीस स्टेशनला धाव घेत चाललेला व घडलेला प्रकार फिर्यादीत नमूद केला.

महिलेने दिलेल्या फिर्यादीत नंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये शांताराम सुडगे या इसमा विरोधात भादवि कलम ३५४ (ए), ३५४ (डी), ५०४ व ५०६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्रोत:(दिनांक १६ जुलै २१ रोजी श्रीगोंदा पो.स्टे मध्ये दाखल फिर्याद)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
